उद्या महाराष्ट्र बंद म्हणजे बंद !

उत्तर प्रदेशातील लखिमपुर खिरी येथे झालेल्या शेतकऱ्यांच्या हत्याकांड विरोधात

दि. ११ ऑक्टोबर, २०२१ रोजी संपूर्ण महाराष्ट्र बंद यशस्वी करा.

देशाची शेती, अन्न सुरक्षा तसेच शेतकरी उधवस्त करणारे तीन कृषी कायदे केंद्र सरकारने जबरदस्तीने लादले. त्याविरोधात गेल्या जून महिन्यापासून शेतकरी आंदोलन करत आहेत. २६ नोव्हेंबर, २०२१ पासून शेतकरी दिल्लीच्या वेशीवर ठाण मांडून बसले आहेत. आंदोलक शेतकरी यांच्याशी संवाद साधून हे शेती विरोधी तीन कायदे रद्द करण्याऐवजी श्रीमान नरेंद्र मोदींचे केंद्र सरकार तसेच भाजप शासित राज्य सरकारे व भाजपचे कार्यकर्ते वारंवार शेतकऱ्यावर हल्ले करत आले आहेत.

शेतकरी आंदोलन चिरडण्याची, शेतकऱ्यांना मारण्याची धमकी देशाचा गृह राज्यमंत्री अजय मिश्रा टेनी खुलेआम दिली. याचाच निषेध करण्यासाठी शेतकरी उत्तरप्रदेश मधे लखीमपुर खिरी येथे कले झेंडे दाखवून शांततेने आंदोलन करत होते. परंतु, गुंड प्रवृत्तीच्या या गृहराज्यमंत्रीच्या गुंड पोराने शांततेत आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यावर मुजोरपणाने गाडी चढवून शेतकऱ्यांची निर्घृण हत्या केली.

एवढे मोठे हत्याकांड करूनही मुजोर मोदी सरकार आणि उत्तर प्रदेशचे योगी सरकार गुन्हेगारांना पाठीशी घालत आहे. शेतकरी वर्षात कट कारस्थाने करत आहे.

अशा शेतकरी विरोधी, देशाच्या अन्न सुरक्षा धोक्यात घालणाऱ्या आणि बळीराजाची शेती मोठ्या भांडवलदारांच्या घशात घालण्याचे धोरण राबवणाऱ्या नरेंद्र मोदींच्या केंद्र सरकारचा तसेच उत्तरप्रदेश सरकारचा निषेध करण्यासाठी उद्या दिनांक ११ ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र बंद घोषित करण्यात आला आहे तरी या बंद मधे महाराष्ट्रातील संवेदनशील जनतेने सक्रियपणे सहभागी व्हावे असे आम्ही आवाहन करतो.

आमच्या मागण्या –

१. अजय मिश्रा टेनी या गुंड मंत्र्याची हकालपट्टी करा व त्याच्या मुलाला आशिष टेनीला फाशीची शिक्षा द्यावी.

२. शेतकरी विरोधी केंद्र सरकारचे कायदे त्वरित रद्द करण्यात यावेत.

आपले नम्र,

शशिकांत सोनावणे, जयश्री घाडी,  वनराज शिंदे, प्रशांत कांबळे, दयानंद कनकदंडे, किशोर मोरे, देवकुमार अहिरे

दीपक साळवे, विजय कांबळे, प्रदीप गायकवाड,  संजय कुंभार.

भूमि सेना, आदिवासी एकता परिषद, भूमिपुत्र बचाव आंदोलन, युवा भारत संघटना.

https://www.facebook.com/yuvabharatallindia

Leave a comment