आंतरजातीय प्रेमविवाह करणाऱ्या जोडप्याच्या कोल्हापूरात घडलेल्या हत्येच्या घटनेचा जाहीर निषेध : यूवा भारत(महाराष्ट्र)

 

आंतरजातीय प्रेमविवाह करणाऱ्या जोडप्याच्या कोल्हापूरात घडलेल्या हत्येच्या घटनेचा युवा भारत संघटना जाहिर तीव्र निषेध करत आहे .

इंद्रजित कुलकर्णी आणि मेघा पाटील या आंतरजातीय प्रेमविवाह करणाऱ्या नवदांम्पत्याचा खून मुलीच्या भावांनी केला. त्या दोघा भावंडांनी सांगितले की बहीणीने बाहेरच्या जातीत लग्न केल्यामुळे शेजारीपाजारी आणि नातेवाईक डिवचत होते , हिनवत होते म्हणून आम्ही खून केला.
तुमच्या घरातील स्त्रीला तुम्हाला नियंत्रणात ठेवता आले पाहिजे, स्त्रियांनी स्वतंत्र विचार करू नये , समाजाची संस्कृती ( जातीची ) व आई वडीलांच्या अपेक्षांचे उल्लंघन करू नये अशी शिकवण देणाऱ्या पुरूषसत्ताक व्यवस्थेचे गोडवे गाणाऱ्यांना वर्तमानातील समाजात महत्व प्राप्त होत आहे . अशा समाजात बुरसटलेल्या मागास विचारांना झिडकारून प्रेम करणे व स्वतःचा जीवन साथीदार निवडून व्यक्ती स्वातंत्र्याचा आनंद घेणे हे येथील समाज व्यवस्थेला रूचणारच नाही .
आपल्याकडे स्री हि शुद्रातिशुद्र मानली जाते त्यामूळे तिच्याकडे व्यक्ती म्हणून न बघता विद्यमान सत्तासबंध अबाधित ठेवण्याकरीताचे एक साधन म्हणून तिच्याकडे पाहीले जाते. तसेच ती पुरुषत्व सिद्ध करण्याच एक साधन असते. स्री ही घरातील पुरुषांच्या किती नियंत्रणात (धाकात) आहे यावरून समाजात त्या घरातील पुरुषांचे पुरुषत्व ठरत असते. सर्व बाजूंनी पुरुषाची बंदिस्त असणे (बोलणे, बसणे, नेसणे, हसणे, खाणे, पिणे, फिरणे, प्रेम करणे, जोडीदार निवडणे- नाकारणे) ही स्री शूद्र असण्याची लक्षणे आहेत. ती पुरूषसत्ताक मूल्ये मानत असेल तर पूजनीय ठरते व स्वनिर्णयाचा अधिकार मागत असेल तर खलनायक. या अपराधाची शिक्षा कधी बलात्कार तर कधी खून असू शकतो.
एकीकडे जातीचे भौतिक आधार गळून पडत असताना जात संपत जाते आहे असे वाटते तर विद्यमान व्यवस्थेत माणसाचे जगणे अस्थिर व असुरक्षित झाल्यामुळे माणसाला आभासी असणाऱ्या जात या संकल्पनेवर उभ्या राहिलेल्या जातीच्या संघटनेचा आसरा हवाहवासा वाटू लागला आहे. दुसऱ्या बाजूला प्रत्येक जातीच्या संघटना बनविण्याच्या प्रयत्नाला आलेला वेग आणि वाढत जाणारी जातीची अस्मिता याचा विचार करणे आवश्यक आहे. जातीत टिकून राहयचे असेल तर व्यक्तीगत व कौटुंबिक पातळीवर लैंगिक सामाजिक व्यवहारात विषमता पाळावी लागेल ह्या पुर्वअटीचे पालन करावे लागते .
इंद्रजित कुलकर्णी आणि मेघा पाटील यांच्या हत्येतून उपस्थित होणारा प्रश्न म्हणजे आजपर्यंत अनुलोम प्रकारच्या विवाहात मुलाकडचे लोक विरोध करताना दिसत परंतु याप्रकरणात मुलीच्या भावांनी दोघांचा खून केला. जातीची मानसिकता कायम ठेवून पुर्वी आंतरजातीय विवाह करताना किमान उच्च जातीच्या जवळ जाण्यासाठी खालच्या जातवर्गाने केलेला प्रयत्न असे समजून विवाह स्वीकाहार्य ठरत होते. याप्रकरणातून उच्च जातीयसुध्दा नातेसबंध नको असे दिसून येते. समाजातील वाढलेल्या जातीय अस्मितेचे कर्मठ व हिंसक स्वरूप तर पुढे येत आहे काय? असा विचार होणे गरजेचा ठरतोय. या खूनासाठी फक्त जातीय अस्मिता कारणीभूत नसून शेजाऱ्यांच्या सततच्या डिवचण्यातून त्या भावांच्या मर्दानगीवर उठणाऱ्या प्रश्नांना व सहन कराव्या लागणाऱ्या भावनिक आणि सामाजिक कुचंबणा यामुळे दिलेली हिंसक प्रतिक्रिया आहे.

या दोघांच्या हत्येला मेघाच्या भावांइतकाच इथला समाज जो जातीय व पुरूषीव्यवस्था टिकवण्याचा प्रयत्न करतोय असे सर्वजण जबाबदार आहेत. यासर्वांचा आपल्याला निषेध करावा लागेल …

हे पत्र युवा भारत ( महाराष्ट्र ) यांचे कडून राज्य संयोजक विनोद भुजबळ व डॉ. सुरेश सोमकुंवर यांनी जारी केले आहे .

Advertisements

One response to “आंतरजातीय प्रेमविवाह करणाऱ्या जोडप्याच्या कोल्हापूरात घडलेल्या हत्येच्या घटनेचा जाहीर निषेध : यूवा भारत(महाराष्ट्र)

  1. Please translate into Hindi or Bengali or English.

    Like

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s