यूवा भारत,महाराष्ट्र चे ४ थे राज्य अधिवेशन संपन्न ..

संदिप कांबळे (अ.भा.समिती सदस्य,यूवा भारत) यांचा रिपोर्ट

युवा भारत संघटनेचे चौथे महाराष्ट्र राज्य अधिवेशन बोपोडी, पुणे येथे दि. २८ व २९ नोव्हेंबर २०१५ रोजी एकविसाव्या शतकातील तरूणाईची गोची या विषयावर पार पडले. अधिवेशनाचा उदघाटन कार्यक्रम मा. घनश्यामजी ( NHCPM राजस्थान ), मा. ज्योतीताई टिळेकर ( पिं. चिं. शहराध्यक्ष, सम्यक युवा मंच महिला आघाडी ) मा. विलास सोनवणे ( जेष्ठ राजकीय कार्यकर्ते व विचारवंत, संस्थापक सदस्य युवा भारत ) सुनील चौधरी ( जेष्ठ कार्यकर्ते युवा भारत, नागपूर ) यांच्या उपस्थितीत व दयानंद कनकदंडे ( अखिल भारत समन्वयक ) यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला . अधिवेशनाच्या सुरूवातीला प्रास्तविकपर भाषण वनराज शिंदे ( राज्य संयोजक महाराष्ट्र ) यांनी केले.
दोन दिवशीय अधिवेशनामध्ये एकूण चार सत्रात प्रमुख वक्त्यांनी विषयावर मांडणी करुन खुली चर्चा करण्यात आली.
१. शिक्षण व रोजगार – या विषयावर अॅड. भूषण पवार व डॉ. सुरेश सोमकुंवर
२. आमचे नातेसंबंध व रिलेशनशिप मधील गोची – किशोर मोरे व शशी सोनवणे
३. भाषेचा झालेला लोच्या व दुनिया भरचे न्यूनगंड – देवकुमार अहिरे व डॉ. दिपक पवार
४. चित्रपट, समाज व संस्कृती – मुक्ता सोनवणे, प्रशांत कांबळे, डॉ. बशारत अहमद
या सर्व वक्त्यांनी विषयावर मांडणी करून चर्चेत सहभाग घेतला.

अधिवेशनामध्ये खालील ठराव पारित करण्यात आले.

१) महाराष्ट्रातील दूष्काळी परिस्थितीवर पर्यायी उपाययोजना करण्याची मागणी करत आहे.
२) मराठी भाषेच्या विकासामध्ये महानूभाव आणि वारकरी संप्रदायाचे अमूल्य असे योगदान राहीले आहे. महानूभाव पंथ प्रवर्तक श्रीचक्रधर स्वामींनी १२ मार्च १२३४ रोजी आपले मराठी भाषेतील पहीले धर्म वचन ‘ येथ आलीया काही मरण असे’ उद्गारले तो दिवस मराठी भाषा गौरव दिवस म्हणून साजरा करण्याची घोषणा करीत आहे .
३) मराठी भाषा गौरव दिनी १२ मार्च २०१६ रोजी श्रीक्षेत्र रिद्धपूर अमरावती येथे दूसरे सकल साहीत्य सम्मेलन सर्वधर्मिय सर्वपंथीय सामाजिक परिषद व अ.भा.महानूभाव चिंतन परिषद व यूवा भारत संघटना यांचे वतीने घेण्याची घोषणा करीत आहे.
४) शासन प्रशासनाच्या क्षेत्रात मराठी वापराचे धोरण राबविण्याची, किमान प्राथमिक शिक्षण मातृभाषेेतून शिक्षण देण्याची व रिद्धपूर अमरावती येथे मराठी भाषा विद्यापीठ स्थापन करण्याची मागणी करीत आहे
५) हरियाना राज्यातील दलित हत्याकांडाचा व देशभर वाढत चाललेल्या अल्पसंख्यांक व दलितांवरील हल्ल्यांचा निषेध करत आहे.
६) पॅरिस येथील दहशतवादी हल्यात मारल्या गेलेल्या सर्वांशी हे अधिवेशन आपल्या संवेदना व्यक्त करते. दहशतवादविरोधी यूद्धाच्या नावाखाली जगभर साम्राज्यवादी शक्तीनी जे यूद्ध चालविले आहे त्याविरोधात आणि जल,जंगल जमीन व भाषा यावरील अधिकारासाठीच्या कूर्दिश जनतेच्या लढ्यास आपला पाठींबा व्यक्त करते.
७) खाण्याच्या अधिकारावर नियंत्रण आणणाऱ्या धोरणाचा निषेध करत आहे.
इत्यादी ठराव यूवा भारतच्या २८,२९ नोव्हेबर २०१५ रोजी पुण्यात संपन्न झालेल्या युवा भारतच्या चौथ्या राज्यस्तरीय अधिवेशनात पारीत करण्यात आले.

FTI व occupy UGC या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठींबा व्यक्त करण्यात आला. देशभरात वाढत चाललेल्या एकूणच राजकीय आणि सामाजिक असहीष्णूतेच्या बाबत गंभीर चिंता व्यक्त करण्यात आली. समाजाच्या पातळीवर जी अभिव्यक्तीची कोंडी निर्मान झाली आहे. त्याविरोधात लढण्याचा निर्धार या अधिवेशनात व्यक्त करण्यात आला. मराठी भाषा गौरव दिनी १२ मार्च २०१६ रोजी श्रीक्षेत्र रिद्धपूर अमरावती येथे दूसरे सकल साहित्य सम्मेलन सर्वधर्मिय सर्वपंथीय सामाजिक परिषद व अ.भा.महानूभाव चिंतन परिषद व युवा भारत संघटना यांचे वतीने घेण्याची घोषणा ही यावेळी करण्यात आली.
सन २०१५ -२०१७ दोन वर्षाच्या कालावधीकरिता राज्य समिती गठीत करण्यात आली. राज्य समिती सदस्य म्हणून देवकुमार अहिरे, अॅड. भूषण पवार, प्रमोद घनवट, अमोल कांबळे, दिपक वाघाडे, अमोल गवळी यांची सर्वानुमते निवड करण्यात आली तर विनोद भूजबळ आणि डॉ. सूरेश सोमकूंवर यांची राज्य संयोजक म्हणून निवड करण्यात आली. नवनियुक्त राज्य संयोजकांचे स्वागत व अभिनंदन वनराज शिंदे व दिपक वाघाडे यांनी केले.
अधिवेशनाचा समारोप कार्यक्रम मा. शोभा करांडे ( सगुणा महिला संघटना ) जयश्री घाडी ( संस्थापक सदस्य युवा भारत ) विलास सोनवणे ( संस्थापक सदस्य युवा भारत ) इक्बाल गाझी ( अखिल भारतीय समिती सदस्य, कोलकाता ) दयानंद कनकदंडे ( अखिल भारतीय समन्वयक ) यांच्या उपस्थितीत व नवनियुक्त राज्य संयोजक विनोद भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s