महात्मा गांधी ते कॉम्रेड पानसरे: भारतातील ब्राम्हणी फॅसिझमचा नवा अध्याय

भारत देशातील समस्त मित्र आणि मैत्रीणिंनो ही वेळ बोलण्याची नाही तर लढण्याची आहे.

आज देशात आणीबाणीची परिस्थिती आहे. ‘गुजरात पॅटर्न’ मध्ये पास झालेल्या ‘चलाख’ विद्यार्थ्याने देशाच्या राजकारणाची सूत्रे हाती घेतल्यानंतर आणि महाराष्ट्रात ‘गुजरात पॅटर्न’च्या परीक्षेसाठी बसवलेल्या विद्यार्थ्याने प्राथमिक धडे गिरवायला सुरुवात केल्यानंतर देश व महाराष्ट्राच्या परिवर्तनवादी चळवळीतील कार्यकर्त्यांची आहुती या भांडवली व साम्राज्यवादी विकास धोरणात जाने हे सुनिश्चित झाले आहे. समतेवर आधारीत समाज निर्मितीसाठी मूलभूत भौतिक परिवर्तनाचा ठोस मुद्दा घेऊन वाटचाल करणार्‍या कोणत्याही कार्यकर्त्याला या पुढच्या काळात भारत देशात व विशेषत: ‘पुरोगामी’पणाचे बिरुद मिरवणार्‍या महाराष्ट्रात नैसर्गिक मृत्यू प्राप्त होईल अशी परिस्थिती सध्या दिसत नाही. तेव्हा आज महात्मा गांधींपासून – कॉम्रेड पानसरेंपर्यंत सर्व परिवर्तनवादी शक्तींना व व्यक्तींना आपल्या ‘रडार’ वर घेणार्‍या या ब्राम्हणी  फॅसिझमचा मुकाबला करण्यासाठी एकत्र येणे ही काळाची गरज आहे.

नव्वदच्या नव-उदारमतवादी धोरणांच्या परिणामांनंतर उध्वस्त झालेले देशभरातील भूमिहीन, आदिवासी व शेतकरी संघर्षाचा ठोस पर्याय न मिळाल्यामुळे आत्महत्या करीत आहेत. गेल्या दशकभरात भांडवली विकासाच्या धोरणांनी लादलेल्या आत्महत्यांच्या या सत्रात संघटित व असंघटित क्षेत्रातील बेरोजगार कामगार व सुशिक्षित बेरोजगारांची देखील भर पडली आहे. मात्र या लादलेल्या आत्महत्येचा पर्याय नाकारून आपल्या जाणिवा जागृत व जीवंत ठेवत आणि येणार्‍या प्रत्येक निराशेला बाजूला सारत समतामूलक समाजासाठी संघर्ष करणार्‍या परिवर्तनवादी चळवळीतील कार्यकर्ता हा आजच्या भांडवली विकासापुढील सर्वात मोठा अडथळा ठरत आहे. आत्महत्येचा पर्याय न स्वीकारणार्‍या अशा  कार्यकार्यकर्त्यांची हत्या करण्यासाठी इथल्या ब्रम्हणी व भांडवली सत्ताधार्‍यांनी विडा उचलला आहे. म्हणजे एकतर “तुम्ही स्वत:च गळफास लावून घ्या नाहीतर आम्ही ते काम करतो!” ही त्यांची भूमिका आहे. राजकीय, सामाजिक व माध्यमांच्या दुनियेतील सत्ता – संपत्तीने माजलेले सर्व ‘कुबेर’ आज या भूमिकेचे समर्थन करीत आहेत.

प्रश्नांचे आभाळ डोक्यावर घेऊन फिरणारा विविध पक्ष – संघटनांमधील कृतीशील कार्यकर्ताच इथून पुढच्या आंदोलंनांची दिशा ठरवणार आहे!

२०१३ साली दाभोळकरांच्या हत्येच्यावेळी तथाकथित ‘पुरोगामी’ व ‘धर्मनिरपेक्ष’ आघाडीचे सरकार महाराष्ट्रात व केंद्रात होते तर आज २०१५ साली धर्मांध व  फॅसिस्ट प्रवृत्तीच्या युतीचे सरकार आहे. गुजरात मधील विकासाचा ‘गोध्रा पॅटर्न’ हा ‘बारामतीच्या खोर्‍यातून’ जातो हे महाराष्ट्राची जनता उघड्या डोळ्यांनी बघत आहे. तेव्हा परिवर्तनाची मशाल आपल्या हातात घेतलेल्या आजच्या नव्या पिढीने ती मशाल आपल्याच तेलाने व आपल्याच खांद्यावर तेवत राहील याची काळजी घेतली पाहिजे. बाकी आजच्या सुजाण पिढीला अधिक काही सांगण्याची गरज नाही!!!

ऑगस्ट २०१३ साली पुण्यात झालेल्या दाभोळकरांच्या हत्येनंतर महाराष्ट्रातील विविध संघटनांनी भरवलेल्या ‘निर्धार’ सभा दीर्घकालीन कृतीकार्यक्रमात परावर्तीत होऊ शकलेल्या नाहीत. या सभांमध्ये उपस्थित असलेल्या विविध व्यक्ति व संघटनांचा ढळत जाणारा ‘निर्धार’ महाराष्ट्राने बघितला आहे. कॉम्रेड गोविंद पानसरेंवरील हल्यानंतर पुन्हा त्याच-त्या चुका करून तरुणांच्या ऊर्जेचा असा अपव्यय करणे परिवर्तनवादी चळवळीच्या भवितव्याला परवडणारे नाही. प्रश्नांचे आभाळ डोक्यावर घेऊन फिरणारा विविध पक्ष – संघटनांमधील कृतीशील कार्यकर्ताच इथून पुढच्या आंदोलंनांची दिशा ठरवणार आहे

संपूर्ण देशभर खांदेपालट चालू असताना परिवर्तनवादी चळवळ देखील त्याला अपवाद ठरू शकणार नाही. कॉम्रेड पानसरेंच्या हल्ल्याच्या निषेधात रस्त्यावर आलेल्या नव्या पिढीतिल कार्यकर्त्यांनी एक व्यापक आघाडी उभा करण्याच्या दिशेने गेले पाहिजे.  आपापसातील संवाद व हस्तक्षेपाच्या नव्या जागा शोधत संघर्षरत राहणार्‍या सर्व कार्यकर्त्यांनी भविष्यातील जन आंदोलनांचे नेतृत्व करण्यासाठी तयार राहिले पाहिजे.

भाषणबाजीच्या पलीकडे जाऊन आपला निषेध व्यक्त करण्यासाठी रस्त्यावर उतरलेल्या राज्य व देशातील सर्व कार्यकर्त्यांना व जनसमूहांना ‘युवा भारत’ संघटना आपला पाठिंबा जाहीर करीत आहे.   

युवा भारत – महाराष्ट्                                                                                                                bharatyuva@gmail.com

दयानंद कनकदंडे (नांदेड) ९६३७३०१२०४                                                                                                 संयोजक,अ.भा.समिती

वनराज शिंदे (पुणे) ९९२१४९४६९६, दिपक वाघाडे(नागपूर) ८८०६६७२२७७                                                                     राज्य संयोजक

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s