9 वे मुस्लिम मराठी साहित्य संमेलन १७ जूनपासून सांगलीत

मुस्लिम मराठी साहित्य संमेलन १७ जूनपासून सांगलीत

by Baswant Vithabai on Monday, May 23, 2011 at 10:47am

मुस्लिम मराठी साहित्य संमेलन १७ जूनपासून सांगलीत

सांगली, २५ फेब्रुवारी/ प्रतिनिधी

मुस्लीम मराठी साहित्य सांस्कृतिक मंडळाच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय नववे मुस्लीम मराठी साहित्य संमेलन दि. १७ ते १९ जून या कालावधीत सांगली येथे आयोजित करण्यात आल्याची माहिती मुस्लीम मराठी साहित्य सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष डॉ. शेख इक्बाल मिन्ने, कॉ. विलास सोनवणे व गझलकार ए. के. शेख यांनी दिली.

या साहित्य संमेलनाचे स्थळ, स्वागत व संयोजन समिती निवडीसाठी दि. ७ मार्च रोजी मुस्लीम अर्बन को-ऑप सोसायटी सभागृहात बैठक आयोजित करण्यात आली आहे. या साहित्य संमेलनात मुस्लीम साहित्यिकांबरोबरच सर्व पुरोगामी संघटना, विचारवंत, व्यापारी व उपेक्षित वर्ग आदींचा सहभाग राहणार आहे. राज्यातील विविध शहरांत प्रतिवर्षी साहित्य संमेलन आयोजित करून त्या त्या भागातील मुस्लीम समाजातील व्यक्तींना न्याय देण्याचा प्रयत्न केला जात आहे. मुस्लीम समाजाचा इतिहास, सांस्कृतिक देवाण-घेवाण, इतिहासातील योगदान, समस्या व उपेक्षित वर्गाचा विचार या साहित्य संमेलनात प्रामुख्याने मांडला जाणार आहे.

यापूर्वीची साहित्य संमेलने औरंगाबाद, कोल्हापूर, नवी मुंबई व जळगाव आदी शहरांत झाली आहेत. त्या वेळी उस्मानाबाद येथील डॉ. बसारप्पा अहमद, अहमदनगर येथील डॉ. बशीर मुजावर, रायगड येथील प्रा. फातिमा मुजावर व पुणे येथील डॉ. ए. के. शेख या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षस्थानी होते. यंदाच्या साहित्य संमेलनातील ग्रंथदिंडीत मुस्लीम समाजाचा इतिहास मांडला जाणार आहे. तसेच मुस्लीम समाज संस्कृतीचे मराठी भाषेशी असलेले नातेसंबंध चित्ररथ व देखावा आदींच्या माध्यमातून साकारले जाणार आहे. सांगली जिल्हय़ातील सर्व सामाजिक व सांस्कृतिक मंडळे व संघटना आदींच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांना या साहित्य संमेलनाच्या स्वागत व संयोजन समितीत घेण्यात येणार असून साहित्यिक, वकील, डॉक्टर, व्यापारी व साहित्यविषयक काम करणाऱ्या संस्थांना सहभागाचे आवाहन करण्यात आले आहे.

या साहित्य संमेलनाच्या नियोजनासाठी युनूस मुलाणी, अ‍ॅड. रियाज जमादार, ए. आय. मुजावर, डॉ. डी. एच. मुल्ला, आसिफ बावा, महंमद वडगावकर, जब्बार तहसीलदार, हनिफ डफेदार, निसार कलाल, रफिक कडलास्कर, प्रशांत पाटील, आयुब मुल्ला व फारूख संगतराज आदी विशेष प्रयत्नशील असल्याचेही डॉ. शेख इक्बाल मिन्न्ो, विलास सोनवणे व ए. के. शेख यांनी सांगितले.

 ·  · Share

Advertisements

One response to “9 वे मुस्लिम मराठी साहित्य संमेलन १७ जूनपासून सांगलीत

 1. ** निमंत्रण **

  मुस्लिम मराठी साहित्य सांस्कृतिक मंडळ, पुणे जिल्हा शाखा आयोजित,

  “परिसंवाद आणि निमंत्रितांचे कवी संमेलन”

  मुस्लिम मराठी साहित्य सांस्कृतिक मंडळ, पुणे जिल्हा शाखेच्यावतीने दिनांक ११ जुने २०११ रोजी सायं. ५.०० वा. महाराष्ट्र विद्यार्थी सहाय्यक मंडळ,आबनावे कनिष्ठ महाविद्यालय, न्यू इंग्लिश स्कूल समोर, साहित्य परिषदेच्या शेजारी, टिळक रोड, पुणे येथे “परिसंवाद आणि निमंत्रितांचे कवी संमेलन” असा एकत्रित कार्यक्रम घेण्याचे योजिले आहे.

  ** सत्र पहिले: परिसंवाद : मुस्लिम मराठी साहित्य- एक ओळख

  वक्ते : १. श्री. बशीर मुजावर : “मुस्लिम मराठी साहित्य”
  २. श्री. अन्वर राजन : “मुस्लिम मराठी साहित्यातील आशय”

  ३. कॉ. विलास सोनावणे : “मुस्लिम मराठी साहित्य चळवळ”

  ** सत्र दुसरे: निमंत्रितांचे कवी संमेलन
  कवि : मालिक नदाफ, ए के शेख, बादशाह सय्यद , बदिउज्जामा गुलाम दस्तागिर बिराजदार व इतर.

  तेंव्हा वरील कार्यक्रमासाठी आपणास हार्दिक निमंत्रण.

  आपले स्वागतासाठी उत्सुक,

  दाहर मुजावर – ९८६०४०६७२४, मालिक नदाफ – ९८५००७५५२६, आय. के. शेख – ९९७०२७८६७६
  सलीम पिंजारी – ९२७०२४४१८४ , शरीफा बाले – ९८५०१९५२७६, मुफिद मुजावर ९४०४७११९४०
  आणि समस्त मुस्लिम मराठी साहित्य सांस्कृतिक मंडळ, पुणे जिल्हा शाखा.

  Like

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s