तरुण मित्रांनो जागे व्हा !

तरुण मित्रांनो जागे व्हा !

– प्रशांत कांबळे

मित्रांनो,

आपल्या देशाची अवस्था गेल्या 62 वर्षांमधे चांगली झाली की वाईट असा प्रश्‍न तुम्हाला विचारला तर तुम्ही म्हणाल चांगली खुप प्रगती करत आहे आपला देश. मोठ मोठ्या कंपन्या येत आहेत, बिल्डींग, टॉवर बनत आहेत, मोठ मोठे मॉल उभे रहात आहेत, मोठ मोठाले रस्ते बनत आहेत, निर-निराळे जॉब उपलब्ध होत आहेत. सर्व काही बरं चाललं आहे. हो की नाही.!

पण हाच प्रश्‍न जर खेड्यापाड्यातल्या तरुणाला विचारा? प्रचंड राग, प्रचंड रोष्‍ आणि अगदी वैतागलेल्या मनस्थितीत उत्तर देईल की नाही देश प्रगतीकडे नाही अधोगतीकडे चालला आहे कारण तो ते जीवन जगत आहे. जीवनाची लढाई हरलेला शेतकरी आत्महत्या करतो आणि त्याचा उध्‍्वस्त होणारा संसार तरुण उघड्या डोळ्यांनी बघतोय. तापत्या उन्हात राब राब राबणारी त्याची माय त्याच्या नजरेसमोरुन हटत नाही. मग कसा म्हणेल तो की हा देश प्रगती करतोय ?

अरे हो आपण तर प्रगत अशा मुंबईचे गावकरी ! आपल्याकडे वेळ कुठे आहे हा सगळा विचार करण्‍यासाठी ? एवढ्या धकाधकीच्या जीवनात कोण कोणाची फिकीर करतो ? आम्ही म्हणतो सोडा ही सगळी नाटकं स्वतःसमोर आरसा ठेऊन विचारा की 10-15 वर्षांपुर्वीच्या मुंबईत जसे तुम्ही छाती ताणून चालायचे तसे आता राहता काय? अहो आपल्याच शहरात आता चालायची लाज वाटते, मुंबईत चालायचं म्हणजे नजर खाली घालूनच चालावं लागतं कारण तुमच्याकडे गाडी नाही म्हणजे तुमची लायकी नाही मुंबईत राहण्‍याची मग उठा आणि निघा नाला सोपारा – विरार आणि अंबरनाथ बदलापुरकडे! तिथेच रहा आणि आमच्या प्रायवेट नोक-या करायला या आणि आमच्या गाड्यांवर ड्रायव्हर व्हा, मॉल, हॉटेलांची साफसफाई करा, पैसेवाल्यांच्या मारवाड्यांच्या दुकानांमधे दिवसभर शिव्या खा! तासन् तास फिरुन सेल्समनगीरी करा, जेवायला सवड नाही म्हणून कुत्र्या-मांजरासारखं रेल्वे प्लॅटफॉर्मवर डबा खा! वेळेत पोहोचण्‍यासाठी जीव मुठीत धरुन रोज लोकलला लटकत प्रवास करा! आहो गाडीत किती जनवारे न्यायची यासाठी नियम कायदे आहेत पण लोकल ट्रेनमधे आपली परिस्थिती जनावरांपेक्षा बेकार झाली आहे !

हीच आहे ना अवस्‍था तुमच्या मुंबईची आणि देशभरातील शहरी जीवनाची? का आपल्याच वाट्याला येत आहे हा सगळा त्रास? शहरातला असो की गावातला आपल्यासाख्‍यांनाच हलाकीचं जीवन का जगावं लागत आहे? नाक्यावर बसून सचिनचा, धोनीचा रेकॉर्ड ठेवणारे आपण कधी याचा विचार केला आहे का मित्रांनो? नाही ना? कारण आपण विचारच करायचा नाही हे ‘त्यांनी’ ठरवलं आहे! सव्वाशे कोटी लोकसंख्‍येचा हा देश काही मुठभर अरबोपती चालवत आहेत. तसे ते ही आपल्यासारखे भारतीयच आहेत. पण त्यांना देश नाही, धर्म नाही, पंथ नाही, गांव नाही. त्यांचा देश, धर्म, नाव, गांव फक्त एकच तो म्हणचे नफा! पैसा!

लोकशाही म्हणजे लोकांनी लोकांच्या हितासाठी चालवलेलं लोकांचं राज्य बरोबर ना? पण गंमत अशी आहे की यात आता आपल्यासारखे लोकच नाहीत. जी काही लोकशाही आहे ती फक्त पैसेवाल्यासाठीच. आपण निवडून दिलेले नगरसेवक, आमदार, खासदार आपल्याकडे ढुंकून तरी बघतात का? आपली कामं करण्‍यासाठी आपण त्यांना निवडून देत असलो तरी आपल्यालाच त्यांच्या दारासमोर भिका-यासारखे उभं रहावं लागतं! जनतेची कोणती कामे केली असा सवाल विचारायची आपली हिंमतच होत नाही कारण हे सर्वच जण गुंड माफिया आहेत. अरबोपतींची, अमेरिकासारख्‍या देशांची दलाली करुन देश विकण्‍यासाठीच हे राजकारणात आलेले असतात. त्यांना विचारांशी, तत्वांशी गरीबांच्या दुःखाशी काहीच देणं घेणं नसतं. विचार, घोषणा हे फक्त आपल्यासारख्‍्या सर्वसामन्यांना निवडणुकीत चुना लावून सत्ता घेण्‍यासाठी असतात. स्वतःला गांधीवादी म्हण्‍वणा-यांनी महात्मा गांधीजींना विकले, शिवरायांचे वारस म्हणवणा-यांनी मांडवलीचाच धंदा केला, आंबेडकरवादी म्हणवणा-यांनी सत्तेच्या तुकड्यासाठी बाबासाहेबांना विकले. आणि आता ज्यांना कुठलंच दुकान उघडता येत नाही त्यांनी मराठीच्या नावाखाली पोटाची खळगी भरायला येणा-या परप्रांतीयांना ठोकून मारवाडी शेट साकरांची दलाली करण्‍याचा नवा उद्योग सुरु केला आहे.

सगळेच पक्षपार्ट्या दलालांच्या, गुंडांच्या माफियांच्या ताब्यात आहेत. सगळे मिळून आपल्याला लुटतायेत, आपल्यात जातीच्या, धर्माच्या, भाषेच्या नावाने भांडणे लावतायेत. पाच-पंचवीस हजाराच्या कर्जापाई शेतकरी आत्महत्या करतोय, लोकलला लटकणारा आपल्यासारखा कष्‍टकरी तरुण ट्रेनखाली पडून रोज मरतोय, हक्काच्या चाळीतून बेघर झालेल्या आपल्या आया-बहिणी त्याच जागेवर उभे राहीलेल्या टॉवरमधे धुणी-भांडी घासतायेत तरी आपण गप्प बसायचं! कधी तरी याच्याविरुद्ध एकत्र येऊन आवाज उठवायचा की नाही की आपण असेच लाचार कुत्र्या-मांजरासारखं जगायचं?

नाही मित्रांनो आता हे सर्व सहन करण्‍याच्या पलीकडे गेलं आहे. सत्तेचा माज चढलेल्यांना लाईनीवर आणण्‍याची वेळ आली आहे. आपल्यासारख्‍या तरुण मित्र-मैत्रिणींनी एकत्र येऊन युवा भारत संघटना स्‍थापन केली आहे. रायगडच्या शेतक-यांच्या जमिनीवर टपलेल्‍या मुकेश अंबानीच्या विरोधातील संघर्ष असो, कि डाऊ या अमेरिकन कंपनीच्‍या विरोधात वारक-यांना सोबत घेऊन केलेला संघर्ष असो कि अगदी अलिकडे आपल्या उत्तन भाईंदरच्या सर्वसामान्य गावक-यांना घेऊन डम्पिंग ग्राऊंडच्या विरोधातील लढा असो – गेली 10 वर्षे आपण युवा भारत संघटनेच्या माध्‍यमातून यांना वठणीवर आणायचे काम करत आलो आहोत.

मित्रांनो चला आता आपल्या बधीर डोक्याला थोडा त्रास देऊ या आणि देश विकायला निघालेल्या या दीड शहाण्‍यांच्या कानाखाली अक्कल काढू या!

प्रशांत कांबळे

Advertisements

4 responses to “तरुण मित्रांनो जागे व्हा !

 1. hey, its good.

  Like

 2. nikhil toshniwal

  mitra, prashant……….
  abhiman vatato tumchyasarakhya marathi
  raktacha amha tarunanna abhimaan vatato…….
  kadak shabd vaparle tarach tarun petun uthato…….
  ani ho,,,,,,,mi suddha tumchya matashi sahamat ahe
  kara ek maharashtriyan marvadi mhanun ghenyat malahi abhiman vatato……..

  Like

  • Dhanyawad!

   Keval abhiman vatun chalnar naahi, keval petunhi chalnar naahi tar aapan sarva bhartiya tarunaani sanghathit hovun sangharsh kela paahije.

   15 august chya nimittane swatantraya rakshanacha sankalpa karu ya !

   Praashant

   Like

 3. Prashant, mitra…..aaplya deshachi ani samajachi khari paristhiti agdi sadhya pan kharkharit shabdat tu mandli ahes.

  Like

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s